शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर पत्रकार विनायक गांवस यांच उपोषण तुर्तास स्थगित

थेट उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घालून देणार भेट, मंत्रालयात तातडीचे बोलावणे..
Edited by: रुपेश पाटील
Published on: January 26, 2023 21:00 PM
views 321  views

सावंतवाडी: शहरातील काही भागात मध्यरात्री झालेल्या अघोषित लोडशेडिंगच्या प्रकरणातील दोषींवर मंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर देखील निलंबनाची कारवाई होत नसल्याने या विरोधात  प्रजासत्ताक दिनी पत्रकार विनायक गांवस यांनी सकाळी ७. ३० वाजल्यापासून आमरण उपोषण छेडले होते. दरम्यान, सायंकाळी सात वाजून 30 मिनिटांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी फोनवरून संवाद साधत राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्यासाठी विनायक गांवस यांना तातडीने मंत्रालयात येण्यासाठी पाचारण करत उपोषण थांबविण्याची विनंती केली. यानंतर हे उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आल. विनायक गांवस यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन उर्फ नारायण राणे, सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, गजानन नाटेकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, पत्रकार हरिश्चंद्र पवार, राजू तावडे, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर, रवी जाधव,  संजय पेडणेकर, समीरा खलील, पत्रकार दीपक गांवकर, रुपेश पाटील, भगवान शेलटे दीपक गांवकर आदींची उपस्थिती होती. 


बबन राणे व बबन साळगावकर व यांच्या हस्ते पत्रकार विनायक गावस यांना लिंबू पाणी देत हे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले. दरम्यान दिवसभरात पत्रकार विनायक गावस यांना अनेक टीम कोकणसादसह पत्रकार संघ, पत्रकार बांधवांसह शैक्षणिक सामाजिक व राजकीय व्यक्तींचा वाढता पाठिंबा मिळाला. पत्रकार विनायक गांवस यांनी शेवटी आपल्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल तमाम स्नेही जणांचे आभार मानले व आपले उपोषण तात्पुरते स्थगित असल्याचे जाहीर केले. तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर माघार घेणार नसल्याचं ते म्हणाले. 


दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी देखील उपोषण स्थळी भेट देत पाठिंबा दिला. मंत्री महोदयांशी याबाबत चर्चा करून तोडगा काढू असं आश्वासन दिले. तर ज्यांच्या विरुद्ध उपोषण आहे त्यात उप कार्यकारी अभियंतांच पत्र वरिष्ठ महावितरण अधिकारी उपोषण स्थगित करण्यासाठी घेऊन आल्यानं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली गेली. तर दिवसभरात माजी सैनिक गुरू गावडे, पत्रकार अनिल भिसे, अभिमन्यू लोंढे, प्रा. तुषार वेंगुर्लेकर, अँड. अनिल केसरकर, आशिष सुभेदार, अँड. निता सावंत, उमेश सावंत, संजय नाईक, वसंत केसरकर, आनंद धोंड, अँड. परिमल नाईक, काशिनाथ दूभाषी, पुंडलिक दळवी, सुधिर आडिवरेकर, राकेश नेवगी, उदय नाईक, देवा टेमकर, शैलेश मयेकर, मुकुंद पिळणकर, प्रवीण मांजरेकर, नरेंद्र देशपांडे, हरिश्चंद्र पवार, प्रशांत मोरजकर, निखील मोरजकर, अँड. राजू कासकर, दीपक गांवकर, मंगेश तळवणेकर, बबन साळगावकर, अमित वेंगुर्लेकर, सुधीर राऊळ, राजू तावडे, मयुरेश सुर्यकांत राऊळ, संजय पेडणेकर, इफ्तेकार राजगुरू, अफरोज राजगुरू, सत्यजित धारणकर, सुरेश भोगटे, रमेश बोंद्रे, देव्या सुर्याजी, सुरेश गवस, वामन सुकी, दिलीप भालेकर, अजित सांगेलकर, विनोद सावंत, रामचंद्र कुडाळकर, महेश लाखे, हर्षवर्धन धारणकर, रामकृष्ण मूंज, अँड. संजू शिरोडकर, मिसबा शेख, प्रसाद अरविंदेकर, भरत केसरकर, मंगल कामत, रविंद्र मडगावकर, शुभम धुरी, अब्जू सावंत, रवी गावडे, चंदू शेडगे, विराग मडकईकर, अन्नपूर्णा कोरगावकर, बबन राणे, गजा नाटेकर, गुरूप्रसाद वाडकर, स्वागत नाटेकर, गौरव दळवी, सुधीर धुमे आदिंसह शेकडो जणांनी सहभागी होत पाठिंबा दर्शविला.