
कुडाळ : कुडाळ तालुक्यामधील सर्वांचे लक्ष असलेल्या माणगाव ग्रामपंचायतची रणधुमाळी रंगत आली आहे.यात माणगाव ग्रामपंचायत निवडणुक वार्ड क्र.३ मधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवसेना पॅनलचे अवधूत गायचोर, भाजप प्रणित पॅनलचे ख्रिस्तोफर जोसेफ डाॅन्टस, बाळासाहेबांची शिवसेना पॅनलचे सुमित आडेलकर, अपक्ष सेलेस्टीन शिरोडकर व अपक्ष चंद्रप्रभ उर्फ (नाना) बोगार अशी लढत होत आहे.तसेच विद्यमान सरपंच याचा मुलगा ख्रिस्तोफर डॉन्टस यांच्यासमोर चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक रंगतदार बनत आहे. विद्यमान सरपंचासाठी प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे. जनता कोणत्या उमेदवाराला कौल देणार? हे येणाऱ्या २० डिसेंबर २०२२ ला चित्र स्पष्ट होणार आहे. विद्यमान सरपंचासाठी ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. सरपंच जोसेफ डाॅन्टस यांच्या बालेकिल्ल्यातच पत्रकार नाना बोगार यांनी सरपंचांचे चिरंजीव ख्रिस्तोफर डॉन्टस यांच्यासमोर येत कडवे आव्हान निर्माण केले आहे.तर शिंदे गटाचे सुमित आडेलकर यांच्या उमेदवारीने ख्रिस्तोफर डॉन्टस यांची डोकेदुखी वाढली आहे.