
सावंतवाडी : वारंगाची तुळसुली (ता. कुडाळ) येथील मूळ रहिवाशी व नोकरीनिमित्ताने मुंबईत राहणाऱ्या गौतमी अशोक जाधव (वय ५९ वर्षे) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने मुंबईतील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. गुरुवारी मुंबईतील गोवंडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत आप्तेष्टांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, दोन भाऊ, वहिनी, जाऊ, दीर, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते तथा स्थानिक बौद्ध महासभेचे पदाधिकारी अशोक जाधव यांच्या त्या पत्नी तर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव व एसटी महामंडळाच्या कणकवली कार्यशाळेचे हेड मेकॅनिक बाळकृष्ण जाधव यांच्या त्या भगिनी होत.