जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात वेंगुर्ल्यात जोडे मारो आंदोलन

Edited by: दिपेश परब
Published on: May 30, 2024 14:14 PM
views 215  views

वेंगुर्ले : महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वेंगुर्ला भाजपच्या वतीने आज जोडेमारो आंदोलन करत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. 

शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मनूस्मृतीचे श्लोक समाविष्ट केल्याच्या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनूस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फडण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ आज गुरुवारी (३० मे) वेंगुर्ला आनंदवाडी समाजमंदिर येथे वेंगुर्ला तालुका भाजपच्या वतीने जोडेमारो आंदोलन करून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला.

यावेळी भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, दादा केळुसकर, वसंत तांडेल, पप्पू परब, ज्ञानेश्वर केळजी, प्रशांत खानोलकर, वृंदा गवंडळकर, प्रशांत खानोलकर यांच्यासहित आनंदवाडी ग्रामस्थ युवराज जाधव, आर. के. जाधव, विशाखा जाधव, मयुरेश जाधव, अर्जुन मठकर, दीपक जाधव आदी उपस्थित होते.