भुईबावड्यात जिवोची सेवा कोलमडली

मोबाईल ग्राहकांना मनस्ताप
Edited by:
Published on: April 09, 2023 17:09 PM
views 177  views

वैभववाडी:भुईबाबडा भागातील जिओची सेवा विस्कळित झाली आहे.आज सकाळपासूनच या भागातील या कंपनीच इंटरनेट व नेटवर्क सुविधा ठप्प झाली आहे.या कंपनीचे सेवा अधिकारी नाॅट रिचेबल झाले आहेत.यामुळे या भागातील ग्राहकांना मनस्ताप करावा लागत आहे.

       तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या भुईबावडा घाटात जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर आहे.यावरुन पंचक्रोशीत नेटवर्क सुविधा उपलब्ध झाली आहे.मात्र आज सकाळपासून या टाॅवरमध्ये बिघाड झाला आहे.त्यामुळे या भागातील या कंपनीची सेवा कोलमडली आहे.नेटवर्क सेवेसह इंटरनेट सुविधा ठप्प झाली आहे.यामुळे या भागातील ग्राहकांची गैरसोय झाली आहे.आॅनलाईन काम करणाऱ्यांच्या कामाचा खेळखंडोबा झाला आहे.याबाबत सेवा अधिकारी यांना संपर्क करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.परंतु हे अधिकारी नाॅट रिचेबल आहेत.