
सावंतवाडी : मळगांव कुंभार्ली येथे जीवन ग्रामसंघ कुंभार्ली व महाराष्ट्र शासन कृषि विभाग आयोजित महिला मेळाव्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने ज्वारी , बाजरी, नाचणी, वरी इत्यादी पौष्टिक तृणधान्याचे जीवनातील व जेवणातील महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच पिक उत्पादन वाढ व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती परिक्षण करुन खतवापर करावा, असे आवाहन करण्यात आले .
महिला सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
महिलांनी स्वत : चे आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी लहान लहान अन्न व फळेभाज्या प्रक्रिया उद्योग उभारावेत व यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेचे अनुदान उपलब्ध आहे सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय दिवेकर, उपविभागीय कृषि अधिकारी अजित आडसुळे, तालुका कृषि अधिकारी प्रमोद बनकर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जीवन ग्रामसंघ कुंभार्लीच्या अध्यक्षा स्नेहल हरमलकर, ग्रामसंघ सचिव शोभा मेस्त्री, कोषाध्यक्ष विजया गावडे, प्रभाग समन्वयक सचिन नाईक, प्रभागसंघ व्यवस्थापक रुपाली गुडेकर यांचेसह प्रभाग संघातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी केला.