आदर्श शिक्षण संस्था पुरस्कारानं जयेंद्र रावराणे सन्मानित

रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 26, 2023 13:17 PM
views 129  views

वैभववाडी : शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा जि.प.सिंधुदुर्गचे  मा.वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांना आदर्श शिक्षण संस्था या पुरस्काराने रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एका वृत्तपत्र समुहाच्यावतीने हा पुरस्कार  सोहळा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता
     
श्री रावराणे हे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. या संस्थेच्या अर्जून रावराणे माध्यमिक विद्यालय,कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय आणि जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल या  विविध शैक्षणिक विभागामार्फत तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात या संस्थेचा जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. या संस्थेच्या यशस्वी वाटचालीत श्री. रावराणे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या कामांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक  धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजार, माजी आमदार बाळासाहेब माने, नवरात्र दैनिकाचे संपादक यासह सिंधुदुर्ग  जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर  उपस्थित होते.