...तर सोडणार नाही ; जयेंद्र रावराणेंचा इशारा

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 20, 2023 20:29 PM
views 266  views

कुडाळ : गेल्या दीड वर्षात विजेच्या धक्क्याने काम करत असताना आमच्या जिल्ह्यात सात मुल मृत्युमूखी पडली. आपला जीव डोकीवर घेवून ही मुलं प्रामाणिकपणे महावितरणचं काम करतात. त्यामुळे आता यापुढे तुम्ही निविदेतील अटी, शर्ती नुसार काम करा. आम्ही निविदेच्या आड येणार नाही. माणुस मेला तर त्या घरात काय होतं हे आम्ही कोरोना काळात अनुभवल आहे. त्यामुळे कंत्राटी काम करणार्‍या मुलांवर यापुढे अन्याय होता कामा नये, अन्याय झाल्यास तुम्हाला आम्ही सोडणार नाही, प्रसंगी आम्हाला अटक झाली तरी चालेले अशा कारवाईंना आम्ही भिक घालणार नाही. असा रोखठोक इशारा माजी सभापती जयेंद्र रावराणे यांनी महावितरणच्या कंत्राटी कामगार पुरविणार्‍या ठेकेदार कंपनीच्या प्रमुखाला दिला.

यावेळी अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांनाही श्री. रावराणे यांनी धारेवर धरत या ठेकेदारावर वचक ठेवण्याची जबाबदारी तुमचीही आहे, ती जबाबदारी तुम्ही नाकारू शकत नाही असे सुनावले. अखेर अधिक्षक अभियंत्यांच्या समोर यापुढे निविदेतील अटी, शर्ती नुसार आपण सिंधुदुर्गात काम करू, कोणत्याही कंत्राटी कर्मचार्‍यावर आपल्याकडुन अन्याय होणार नाही अशी ग्वाही ठेकेदाराने दिली.