सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांचा तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2023 21:51 PM
views 90  views

सावंतवाडी : कमानी पूल कमकुवत झाल्याने 'अवजड वाहनांना बंद' करण्यात आलेल्या आंबोली घाटातील वाहतूक पोलीस खात्याशी संगनमत करून तडजोड करून रात्रीच्या वेळी सोडण्यात येत असल्याबाबतची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांचाकडे केली होती. या तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून मनाई हुकूम झुगारून वाहतूक करणाऱ्या वाहन चालक-मालक यांचाशी संगनमत करणाऱ्या सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, दाणोली पोलीस चौकी व आंबोली पोलीस चौकी येथे कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार यांचावर कोणतीच कारवाई झालेली नसून याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेऊन कारवाई होईल असा प्रयत्न करणार असल्याचे श्री. बरेगार यांनी सांगितले.


 कमानी पूल कमकुवत झाल्याने "अवजड वाहनांना बंद" करण्यात आलेल्या आंबोली घाटातील वाहतूक, पोलीस खाते संगनमत करून तडजोड करून रात्रीचे वेळी सोडण्यात येत असल्याबाबतची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांचाकडे केली होती. २३ मार्च २०२३ रोजी हे निवेदन दिल होत व त्याची प्रत जिल्हा पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांना दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन चौकशी कामी पोलीस खात्याकडे पाठविले असल्याचे १९ मे २०२३ अशी तारीख लिहिलेले पत्र २६ मे २०२३ रोजी सावंतवाडी पोलीस ठाणे यांचेकडून श्री. बरेगार यांना प्राप्त झाले आहे.


त्यामध्ये प्राप्त विषयाचे अनुषंगाने यापूर्वीच पोलीस चौकी येथील पोलीस अंमलदार यांनी पकडलेल्या १९ चिरे वाहतूक करणाऱ्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर करण्यात आल्याचे कळविले आहे. परंतु हि कारवाई राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांनी आंबोलीत अचानक येऊन केलेल्या आंदोलनानंतर करण्यात आल्याचे नमूद करण्याचे सोयीस्कर रित्या टाळलेले आहे. अन्यथा सावंतवाडी पोलीस ठाण्याला ०९ डिसेंबर २०२० रोजी अशी कारवाई करण्याचे पत्र मिळून सुद्धा, २०२३ सालपर्यंत का करण्यात आली नाही ?असा सवाल श्री. बरेगार यांनी उपस्थित केला आहे.


श्री. बरेगार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी पत्राने केलेल्या मागणीची दखल घेऊन, आंबोली मार्गाने अवजड वाहनांना मालवाहतुकीचे परवाने देणेस मनाई करण्याबाबत ( योग्य ती कारवाई) वनविभाग, महसूल विभाग यांना लेखी पत्र दिल्याचे सावंतवाडी पोलीस खात्यामार्फत लेखी कळविले असलेबाबत कळविले आहे. परंतु ०९ डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत मनाई हुकूम झुगारून वाहतूक करणाऱ्या वाहन चालक/मालक यांच्यावर कोणतीही कारवाई पोलीस खात्याने केलेली नाही. आरटीओ व महसूल खात्या मार्फत कारवाई करायला लावलेली आहे. तसेच ०९ डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत मनाई हुकूम झुगारून वाहतूक करणाऱ्या वाहन चालक,मालक यांच्याशी संगनमत करणाऱ्या सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, दाणोली पोलीस चौकी व आंबोली पोलीस चौकी येथे कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेऊन, "ती कारवाई होईल' असा प्रयत्न आपण करणार असल्याचे श्री. बरेगार यांनी सांगितले.