
सावंतवाडी : लाडक्या बहिणीच्या ऐवजी सुरक्षित बहिणीची आग्रहाने मागणी केली पाहिजे. या राज्याच्या तिजोरीची अतिशय बिकट अवस्था आहे. आज महाराष्ट्रात ८ लाख कोटी रुपयांच कर्ज डोक्यावर केलं आहे. कोकणातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणसं फार हुशार आहेत. मागच्या लोकसभेत पैशांचा पाऊस पडला. एवढे पैसे यांनी आणले कुठून हा मनाला विचार करा. एवढे जर हे रस्त्याने वाटायला लागले तर यांच्या घरी किती असतील याचाही अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे. प्रचंड असा भ्रष्टाचार महाराष्ट्रात सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार यांनी केला. त्यांनी महाराष्ट्रात काहीही सोडलेलं नाही. गणवेशाच्या संदर्भात सतराशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. शैक्षणिक वर्ष निम्म संपलं तरी बऱ्याच शाळांमध्ये गणवेश मिळालेला नाही ही आजची अवस्था आहे.
या भूमीने स्वर्गीय माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचं कार्य बघितला आहे. आपल्या मनात त्यांचा आदर्श आहे. स्वर्गीय शिवरामराजे भोसले या मतदारसंघात सहा वेळा निवडून गेलेले आहे. त्यांचा एक वेगळा आदर्श आपल्या सर्वांच्या समोर आहे. दयानंद मटकर यांच्या समाजवादी विचारसरणीची आठवण करून आपण या ठिकाणी काम करतो. आमची महा विकास आघाडीला विनंती आहे की, अर्चना घारे याच या ठिकाणच्या योग्य उमेदवार आहेत आणि तेच या मतदार संघात चांगला परफॉर्मन्स दाखवून विजयी होतील आणि म्हणून शिवसेनाप्रमुख काँग्रेस यांना विनंती करणार आहे महाविकास आघाडीत याची चर्चा होईल आणि याच्यावर शिकवा व असा आमचा प्रयत्न आहे.
शिवस्वराज्य यात्रा आज आम्ही आपल्या दारात घेऊन आलो आहे. महाराष्ट्राचे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालले पाहिजे आणि हे चालत असताना शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श घेऊन हे महाराष्ट्राचे राज्य पुढे नेण्याचं काम महाविकास आघाडी करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.