कुडाळ : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आंदोलन पुरकारालय. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी होणार आहेत.
२८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता मालवण राजकोट येथे येणार आहेत. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी १०-३० वाजता मालवण राजकोट (छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ)येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.