जयंत बरेगार यांचं उपोषण मागे

Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 14:50 PM
views 126  views

सावंतवाडी : सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी वन विभागातील कुडाळ वनपरिक्षेत्रातील माणगाव परिमंडळाची आंबेरी अनधिकृत वनोपज तपासणी नाका बंद करण्यात यावा या मागणीसाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर येथे उपोषण करण्याचा इशारा दिला होता.


सन 2013 पासून सावंतवाडी वन विभागातील कुडाळ वनपरिक्षेत्रातील माणगाव परिमंडळाची आंबेरी येथे अनधिकृत वनोपज तपासणी नाका सुरू होता. या तपासणी नाक्याच्या माध्यमातून गाड्या तपासणीच्या नावाखाली अवैद्य पद्धतीने वाहनांची तपासणी करून वाहनधारकांकडून आर्थिक वसुली केली जात होती. या पार्श्वभूमीवर वन विभागाचा तपासणी नाका तात्काळ बंद करून वाहनधारकांची आर्थिक लूट थांबवावी या मागणीसाठी उपोषणकर्ते जयंत बरेगार यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर येथे उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

      दरम्यान, उपोषणकर्ते जयंत बरेगार हे मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर येथे आल्यानंतर त्यांची पोलिसांनी वन विभाग रेस्ट हाऊस या ठिकाणी मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्याशी भेट घालून देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान उपोषण करते यांच्या मागणीच्या अनुषंगाने मुख्य वन संरक्षक प्रादेशिक कोल्हापूर वन वृत्त कोल्हापूर रामानुजम यांनी अनधिकृत तपासणी नाका तात्काळ बंद करण्याचे लेखी आदेश दिल्याने तसेच यातील दोषींवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव नागपूर येथील वरिष्ठ वन विभाग कार्यालयास पाठवला जाईल व येत्या पंधरा दिवसात त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते जयंत बरेगार यांचे समाधान झाल्याने त्यांनी आज रोजीचे उपोषण मागे घेतले आहे.