
सिंधुदुर्गनगरी : जुलै या जागतिक हिपॅटायटीस (कावीळ) बी व सी दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामार्फत २२ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत जिल्हास्तरावर पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याचा मुख्य उद्देश सन २०३० पर्यंत हिपॅटायटीस (कावीळ) सी आजाराचे निर्मुलन करणे व व हिपॅटायटीस वी आजाराचे सनियंत्रण करुन मासिक, रोगग्रस्त रुग्णांचे प्रमाण कमी करणे हे आहे. त्यामुळे पंधरवडा कालावधीत संशयित रुग्णांची तपासणी, पटनाट्य, सर्धा यांच्यातून जनजागृती केली जाणार असल्याचे सांगतानाच जिल्हयातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य निरोगी व सुदृढ रहावे यासाठी जिल्हा रुग्णालय सज्ज आहे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रिय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये सुरु करण्यात आला आहे. सन २०३० पर्यंत हिपॅटायटीस (कावीळ) सी आजाराचे निर्मुलन करणे व व हिपॅटायटीस वी आजाराचे सनियंत्रण करुन मासिक, रोगग्रस्त रुग्णांचे प्रमाण कमी करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दीष्ट आहे. २८ जुलै या जागतिक हिपॅटायटीस (कावीळ) बी व सी दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामार्फत २२ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत जिल्हास्तरावर पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे व्हायरल हिपॅटायटीस आजाराच्या चाचण्या केल्या जातात. व त्यात बाधित आढळलेल्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे औषधोपचार केले जातात. जिल्हयातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य निरोगी व सुदृढ रहावे यासाठी जिल्हा रुग्णालय सज्ज आहे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
कैद्यांचीही होणार हिपॅटायटिस तपासणी
या पंधरवडयाच्या कालावधीमध्ये जिल्हा कारागृहामधील कैद्यांची हिपॅटायटीस (कावीळ) बी व सी तपासणी करण्यात येणार आहे तसेच बस स्थानके, शाळा, महाविद्यालयांमध्ये पथनाटय, रॅली, रांगोळी स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, माहिती फलक, जनजागृती व्याख्याने/पथनाटय इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.