
देवगड : जामसंडे ही कबड्डी ची पंढरी असून जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धांमधून या जमसंडे चे नाव उंचावले आहे.अशा स्पर्धांना प्रोत्साहन देणे हेच कार्य आपले पालकमंत्री नाम.,नितेश राणे करीत असताना या भागाचा सर्वागीण विकास करण्यासाठी पालकमंत्री कटिबद्ध आहेत परंतु अशा मंडळांचे आलेख उंचावणे साठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू असतात असे प्रतिपादन भाजप सरचिटणीस संदिप साटम यांनी जामसंडे येथील कबड्डी स्पर्धा उदघाटन सोहळ्या प्रसंगी बोलताना केले.
या प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे यांनी जामसंडे येथे सन्मित्र मंडळाच्या वतीने आजपर्यंत जिल्हास्तरीय ,राज्य स्तरीय तसेच व्यावसायिक कबड्डी बरोबर महाराष्ट्र शासन शिवशाही चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या यामागे कबड्डीचा प्रसार आणि प्रचार होणे हाच उद्देश होता .आणि कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे.त्यातून आज वाडीवाडीवर कबड्डी संघ तयार झाले आणि तालुक्यात कबड्डीच्या स्पर्धा रंगल्या यामधूनच देवगडचा कबड्डीचा एक चांगला संघ बनला आहे.असे सांगून या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त केल्या.
हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने जामसंडे पंचक्रोशी कबड्डी मंडळ आयोजि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नाम. नितेश राणे यांच्या सहकार्यातून बुधवार दिनांक ५ मार्च २०२५ रोजी जामसंडे येथे पुरुष खुलागट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार ऍड अजित गोगटे,भाजप सरचिटणीस संदीप साटम,भाजप चिटणीस संतोष किंजवडेकर,गटनेते नगरसेवक शरद ठुकरुल ,भाजप शहर अध्यक्ष दयानंद पाटील,मिलिंद साटम,मंगेश लोके,नरेश डामरी,वाहतूक पोलीस प्रवीण सावंत,चद्रकांत कावले,प्रवीण जोग,बाबू लाड,प्रशांत वारीक नगरसेविका सौ तन्वी चांदोस्कर सौ मृणालीनी भडसाळे,यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने जामसंडे पंचक्रोशी कबड्डी मंडळ आयोजित जिल्ह्यातील नामवंत १६ संघांचा सहभाग असलेली पुरुष गट खुल्या कबड्डी स्पर्धा जामसंडे येथील कै. इंदिराबाई ठाकूर क्रीडा नगरीमध्ये संपन्न झाला.यावेळी स्पर्धेचे प्रास्तविक प्रशांत वारीक यांनी केले.या स्पर्धेच्या निमित्ताने भाजप सरचिटणीस संदीप साटम,माजी आम.ऍड अजित गोगटे यांनी मार्गदर्शन करून स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त केल्या.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला १५ ०००/ व चषक, द्वितीय विजेत्या संघाला १०,०००/ व चषक तर तृतीय व चतुर्थ क्रमांक विजेत्या संघांना प्रत्येकी पाच हजार रुपये व चषक तसेच वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट चढाईपटू व उत्कृष्ट पकड यांना प्रत्येकी १०००/ व चषक अष्टपैलू खेळाडू १५००/ व चषक इत्यादी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले होते.
या हौशी कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघाने आपले नाव कोरले असून मॅन ऑफ द मॅच: प्रथमेश पेडणेकर;अंतिम सामन्यातील गेम चेंजर खेळाडू मकरंद पाटकर ठरला आहे. या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघाने आपले नाव दशकावर कोरले असून रोख रक्कम 15000 व स्मृतिचिन्ह देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक: पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघाला रोग रक्कम 15000 व चषक देऊन गौरविण्यात आले तर. द्वितीय क्रमांक: यंग स्टार कणकवली या संघाला रोख रक्कम दहा हजार व चषक देऊन गौरविण्यात आले तसेच तृतीय क्रमांक: पंचक्रोशी फोंडा या संघाला रोख रक्कम 5000 व चषक देऊन गौरविण्यात आले असून चतुर्थ क्रमांक: लक्ष्मीनारायण वालावल हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच: प्रथमेश पेडणेकर ( यंग स्टार कणकवली) अंतिम सामन्यातील गेम चेंजर खेळाडू: श्री मकरंद पाटकर. ( पंचक्रोशी जामसंडे)
उत्कृष्ट चढाई: सुमित गावडे ( यंगस्टार कणकवली)
उत्कृष्ट पकड: सिद्धेश्वर भटसाळे ( पंचक्रोशी जामसंडे)
अष्टपैलू खेळाडू: अजिंक्य महाले.( पंचक्रोशी जमसंडे)
स्पर्धेतील शिष्यबद्ध संघ: जय महाराष्ट्र सावंतवाडी. या संघाला रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रवीण जोग, अंकुश उर्फ बाबू लाड, दया पाटील, सौ मृणाली भडसाळे, प्रशांत वारीक, संदेश पाटकर, विनय सांगळे,अभिषेक सांगळे, पराग हिरणाईक, रुपेश साठे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी, प्रणव घाडी, मोहन सनगाळे यांनी केले. आभार विनायक सांगळे यांनी मानले.