देवगडकरांची साथ हवी आहे : आ. नितेश राणे

Edited by:
Published on: December 31, 2023 13:38 PM
views 331  views

देवगड : नववर्षाच्या स्वागतासाठी व ज्यामुळे देवगडची ओळख आहे असा जल्लोष या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले देवगडचे नाव उज्वल करण्यासाठी देवगडकरांची साथ महत्वाची आहे. या वेळी शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी शालेय चित्रकला स्पर्धान चे आयोजन करण्यात आले होते. तसेच खवय्यासाठी फूड्स्टॉल उभारण्यात आले होते. लहान मुलासाठी अनेक खेळ ..तसेच सायंकाळी 7.00 वा.मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य स्टेजचे अनावरण करण्यात आले. व गणेश वंदना यावेळी करण्यात आली. आमदार नितेश राणे यांचे हस्ते जल्लोष कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तसेच यानंतर या ठिकाणी स्थानिक मुलांनी आपला कलाविष्कार कार्यक्रम सादर केला.व रात्रौ 9.00 वाजता ऑर्केस्ट्रा बेधुंद सादर करण्यात आला.

यामध्ये गायिका कविता राम, नचिकेत देसाई आदी कलाकारांनी आपली कला सादर केली.