देवगडात 'जल्लोष 2024' !

शुभम घेवारी यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 22, 2023 18:20 PM
views 183  views

देवगड : देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था आयोजित 'जल्लोष 2024' कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी 30 व 31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. याचा कार्यालयाचे उद्घाटन शुभम घेवारी यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी जल्लोष कार्यकारिणी अध्यक्ष हनीफ मेमन, सचिव संजय धुरी, उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, बंटी कदम, मिलींद मोर्ये, एकनाथ तेली,मिलींद मोहिते,दयानंद पाटील, दयाळ गावकर, दिनेश पटेल, मिलिंद खडपकर, जागेचे मालक चंद्रहास मर्गज आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वच मान्यवर पत्रकारांचे स्वागत करण्यात आले. शुभम घेवारी यांनी उदघाटनपर भाषणात संबोधित करतांना शुभेच्छा दिल्या. पत्रकार संतोष कुलकर्णी, राजेंद्र मुंबरकर, हेमंत कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले. एकनाथ तेली यांनी सर्वांग सुदंर देवगडमध्ये असे कार्यक्रम वारंवार व्हावेत, यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे सुचविल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली हडकर हिने केले. सचिव संजय धुरी उपस्थितांचे आभार मानले. 

शनिवार 30 डिसेंबर रोजी शालेय चित्रकला स्पर्धा, खवय्यासाठी फूड्स्टॉल, लहान मुलासाठी अनेक खेळ. सायंकाळी 7.00 वा.मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य स्टेजचे अनावरण होईल व गणेश वंदना होईल.  8.00 वाजता आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते जल्लोष कार्यक्रमाचे उदघाटन होईल. यानंतर स्थानिक कलाविष्कार सादर करण्यात येतील. रात्रौ 9.00 वाजता ऑर्केस्ट्रा बेधुंद सादर करण्यात येईल, यामध्ये गायिका कविता राम, नचिकेत देसाई आदी कलाकार असतील. रविवार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता काही निवडक रेकॉर्ड डान्स सादर केले जातील. रात्रौ 9.00 वाजता जल्लोष 2024 हा हास्यसम्राट फेम अमीर हडकर यांचा ऑर्केस्ट्रा सादर केला जाईल. यामध्ये दगडी चाळ फेम पार्श्वगायिका मुग्धा कराडे, स्वप्निल गोडबोले, सौरभ दप्तरदार, अंशिका चोणकर, डांसर मेघा, निवेदक दुनियादारी फेम प्रणव रावराणे आदी कलाकार समाविष्ट असतील. रात्रौ बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी होईल अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन यावर्षी करण्यात आलेल आहे