
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील "जलजीवन मिशन" प्रकल्पाअंतर्गत चालू असलेल्या कामाची चौकशी आपल्या पातळीवर करावी.अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी जिल्हाधकाऱ्यांकडे केली आहे.
एकनाथ नाडकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,भारत सरकारच्या महत्त्वकांशी योजने मधील असलेली जल जीवन मिशन हि योजना अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील बऱ्याच तालुक्या मध्ये या योजनेची कामे चालू आहेत.
परंतू खेदपूर्वक आपल्या निदर्शनास हि गोष्ट आणू इच्छितो की सदरील कामे हि अपूर्ण आहेत. ठेकेदार व अधिकारी यांचे योग्य नियोजन नसल्याकारणाने आज ग्रामीण भागात सदरील योजनेचा बोजवारा उडाला आहे.पाणी टंचाई दूर व्हावी या हेतूने सदरील योजना हि ग्रामीण भागात अतिशय महत्त्वाची आहे.
जिल्ह्यामध्ये चालू असलेली व ठेकेदारांच्या मनमानी कारभार मुळे अपूर्ण असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाची आपल्या स्तरावरून तातडीने चौकशी व्हावी अशी विनंती केली आहे.