
कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नाटळ सांगवे विभागीय कार्यालयाच्या वतीने जिलेबी व समोशे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, सांगवे सरपंच संजय सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, तसेच पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपसरपंच उपस्थित होते.