
मालवण : कुडाळ मालवण तालुक्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक उद्या गुरुवार दि. ०८ रोजी सकाळी ११ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, ओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी कुडाळ मालवण तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या प्रलंबित कामांबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख कुडाळ तालुकाप्रमुख- राजन नाईक ९४२१२३५३००, मालवण तालुकाप्रमुख- हरी खोबरेकर मोबा- ९४०४१६५२०९ या मोबाईल नंबरवर लेखी स्वरूपात पाठवाव्यात. व सदर बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना प्रवक्ते मंदार केणी यांनी केले आहे.