'जय जय महाराष्ट्र माझा' महाराष्ट्राचं राज्यगीत होणार

सांस्कृतिक मंत्र्यांची माहिती
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 18, 2022 20:14 PM
views 201  views

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच 'जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत म्हणून वाजणार आहे. हे गाणं राज्याचे अधिकृत गीत म्हणून सरकारशी संबंधित सर्व औपचारिक कार्यक्रमांमध्ये हे गाणं लावकरच वाजवणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. तसंच आधीचे जूने गीत दोन कडवे कमी केलं जाणार असल्याचही मुनगंटीवारांनी सांगितलं. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून घोषित करण्याचा विचार सरकारच्यावतीने केला जात असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्राचं राज्य गीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा, बहु असोत सुंदर संपन्न की महान आणि मंगल देशा पवित्र देशा या तीन गाण्यांचा पर्याय होता. यात जय जय महाराष्ट्र माझा या गीताचा निवड करण्यात आली आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याअगोदर सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलण्याची घोषणा केली होती.

राष्ट्रगीत हे 52 सेकंदाचं आहे. जय जय महाराष्ट्र हे गीत मूळ शब्द बदलले जाणार नाहीत याची काळजी घेत 1.15 ते 1.30 मिनिटांत बसेल असं नियोजन केलं जात आहे. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणं गायलं जाईल आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता होईल अशी माहितीही मुनगंटीवर यांनी दिली.