
कुडाळ : कोकणचं पहिलं दैनिक 'दै. कोकणसाद' व कोकणचं नं. १ महाचॅनल 'कोकणसाद LIVE' च्या माध्यमातून 'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा', ही विशेष मालिका सुरु करण्यात आली होती. साहित्यक्षेत्रात योगदान देणाऱ्या तब्बल ४० साहित्यिकांच्या मुलाखती त्यामध्ये घेण्यात आल्यात. अखंडीतपणे दर रविवारी या मुलाखती प्रकाशित करण्यात आल्या असून दैनिक कोकणसादच्या वर्धापन दिनी कोकणच्या साहित्य चळवळीचा 'साक्षीदार' असणारे साहित्यिकाशी संवाद साधलाय. हे साहित्यिक म्हणजे सिंधुदुर्ग सुपुत्र आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक डॉ. महेश केळुसकर. शनिवारी सकाळी 8 वाजता तुम्हाला ही मुलाखत पाहता येणार आहे.
अलीकडेच १२ जुलै २०२४ रोजी ठाणे येथील जुपिटर हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी यशस्वी झाली. डॉ. दयानंद कुंबळा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जन डॉ. सौम्य जेनासामंत यांनी सात तास अखंड परिश्रम करून ही शल्यक्रिया केली. डॉ. केळुसकर यांना १७ जुलैला डिस्चार्ज मिळालेला असला तरी पुढील दोन महिने त्यांना फोनवर बोलणे, कार्यक्रम करणे, प्रवास करणे यासाठी मनाई करण्यात आली आहे. असे असले तरी 'कोकणसाद' ने आधीच अलिकडेच ( २९ जून रोजी) रेकॉर्ड करून ठेवलेली डॉ. महेश केळुसकर यांची विशेष मुलाखत समस्त साहित्य रसिकांना व अभ्यासकांना पहायला मिळणार आहे. येत्या २० जुलैला सकाळी 8 वाजता फक्त ' कोकण साद' LIVE वर पाहता येईल.