जादुगार केतनकुमारला कला गौरव पुरस्कार प्रदान

Edited by: विनायक गांवस
Published on: April 09, 2023 18:40 PM
views 225  views

सावंतवाडी : महाराष्ट्र युवा कला गौरव 2022 उत्कृष्ट युवा जादुगर म्हणून जादुगार केतनकुमार अर्थात सावंतवाडीतील केतन सावंत यांचा गौरव करण्यात आला. कला गौरव सिंधुदुर्गमध्ये उत्कृष्ट जादु कला म्हणून हा युवा पुरस्कार केतन सावंत यांना देण्यात आला आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने व माझ्या जादू क्षेत्रातील गुरूंच्या व माझ्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने या पुरस्काराचा मानकरी ठरलो. हा सन्मान मी आनंदाने स्वीकार करत आहे अशी भावना केतन सावंत यांनी व्यक्त केली.