जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे "जबाब दो" आंदोलन

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 06, 2023 16:43 PM
views 99  views

ओरोस ; आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतो देणार नाय  घेतल्याशिवाय राहणार नाय, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दानानून सोडत जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा समाजाच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जबाब दो आंदोलन छेडण्यात आलं. जोपर्यंत जालना येथील पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा आदेश देणाऱ्या  झारीतला शुक्राचार्य  माहिती पडत नाही तोपर्यंत मराठा बांधव शांत राहणार नाही, हे आरक्षण आमच्या हक्काचं असून  ते मिळविल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे वकील सुहास सावंत म्हणाले तर वकील सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा बांधवांना संबोधित करत होते यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाज मनोज पाटील यांच्या पाठीशी असल्याचेही सांगितले.

या जबाब दो आंदोलनाला आमदार वैभव नाईक, वकील सुहास सावंत, माजी सभापती  विकास सावंत, माजी जी प सदस्य अमरसेन सावंत, भास्कर परब, धीरज परब नगरसेवक मंदार शिरसाट, शैलेश घोगळे, संग्राम सावंत, भूपत सेन सावंत, सुंदर सावंत, सीताराम गावडे, राजेंद्र राणे, रामचंद्र पोकळे, आनंद भोगले, राघोजी सावंत, मनोहर येरम, बाबा सावंत, वकील सोनू गवस रुपेश पावस्कर आदी उपस्थित होते.

जालना येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला याचा निषेध म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जबाब दो आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांना आदेश देणारा झारितला शुक्राचार्य कोण हेच विचारण्यासाठी आम्ही जबाब दो आंदोलन छेडलं असल्याची जिल्हाध्यक्ष वकील सुहास सावंत यांनी सांगितले.

 तर या मराठा बांधवांना संबोधित करताना आमदार वैभव नाईक यांनी, मराठा समाजाने आपली भूमिका खंबीरपणे मांडावी, जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मेळावे घ्यावेत, आरक्षणाचा प्रश्न धगधगता ठेवण्याचे काम समाज बांधवांनी करावं मनोज पाटील यांच्या या उपोषणामुळे मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल असा विश्वास आहे यावेळी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय मराठा संघाच्या वतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या इतर मागासवर्गीय जिल्हा प्रमुख रुपेश पावस्कर यांनी पाठिंबा दिला.