
वैभववाडी : खांबाळे येथील आदिष्टी मंदिरात होत असलेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत कुडाळ येथील प्राथमिक शिक्षक कलामंच प्रासादिक भजन मंडळाचे बुवा राजेश गुरव यांनी दणक्यात बारी केली. सर्व शिक्षक मंडळींचे असलेले भजन मंडळ आहे. सुरवातीपासून शेवटपर्यंत उत्तम सादरीकरण करीत भजन रसीकांच मनोरंजन केले. बुवांचा पहाडी आवाज त्याला वाद्य व कोरसची उत्तम साथ मिळाली.