कोकण रेल्वेकडे होणार दुर्लक्ष अयोग्य..!

पंतप्रधान मोदींचं वेधणार लक्ष : माजी मंत्री सुरेश प्रभू
Edited by: विनायक गांवस
Published on: May 13, 2025 15:31 PM
views 120  views

सावंतवाडी : वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी ५०० कोटी बजेटमध्ये तरतूद असूनही खर्च केले गेले नाही हे दुर्दैव आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या लोकांनी जागा दिल्यानं कोकण रेल्वे झाली. अन्यथा, ती झाली नसती. त्यामुळे माझा यासाठी प्रयत्न राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही बाब मी घालेन. कोकण रेल्वेकडे होणार दुर्लक्ष अयोग्य आहे असं मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील अपुऱ्या राहिलेल्या रेल्वे टर्मिनस बाबत विचारलं असतं ते बोलत होते. 

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर, सीमा मठकर यांनी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी पुर्णत्वास न आलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबत त्यांनी प्रभूंच लक्ष वेधलं. यावेळी श्री. प्रभूंना विचारल असता ते म्हणाले, मी मंत्री झालो तेव्हा कोकण रेल्वेला २५ वर्ष झाली होती. एवढ्या वर्षात ही रेल्वे शेडमध्ये लावून ठेवली होती. कोकण रेल्वेला मेन स्ट्रीटमध्ये मी आणल‌ं.  नवीन १३ स्टेशन देत प्रत्येक ठिकाणी चांगल्या सुविधा दिल्या. दुपदरीकरणाच काम पूर्ण केलं. मात्र, दुर्दैव असं की वैभववाडी ते कोल्हापूरसाठी ५०० कोटी बजेटमध्ये तरतूद असूनही खर्च केले गेले नाहीत. कोकण रेल्वे ही सर्वसामान्य माणसाची आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या लोकांनी जागा दिल्यानं ही रेल्वे झाली. अन्यथा, ती झाली नसती. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसह रेल्वे प्रश्नी माझा प्रयत्न राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही बाब मी घालेन.  कोकण रेल्वेकडे दुर्लक्ष केलं जातं ते अयोग्य आहे. याकडे लक्ष घालण्याची विनंती मी करेन असे मत श्री. प्रभू यांनी व्यक्त केले.