
दोडामार्ग : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या झाल्याने शिक्षक पतपेढीच्या ना हरकत दाखल्यासाठी शिक्षक पतपेढी प्रशासन त्यांच्याकडून राजीनामा मागत असल्याची गोष्ट पतसंस्था घटनेला अनुसरून नसल्याचे स्पष्ट मत मालक सभासद शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक यांनी व्यक्त करत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आंतरजिल्हा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे तीनशे शिक्षक पर जिल्ह्यात जाणार आहेत. परंतु प्राथमिक शिक्षक पतपेढीचे येणे व देणे याचा विचार करता कर्ज फेडल्यानंतर किंवा येणे देणे विचार करता, पतपेढीच जर संबंधित शिक्षक मालक सभासदाला देणे लागत असेल, तर पतपेढीला त्यांना हरकत दाखला देण्यास काहीच हरकत नाही. परंतु असे न करता शाखाधिकारी मात्र आपण राजीनामा द्या. मग तुम्हाला लगेच राजीनामा मंजूर न होताच ना हरकत दाखला देऊ, अशा प्रकारे सांगितले जाते. हे वास्तविक एक प्रकारचं त्या त्या सभासदावर दबाव टाकून घेतलेला राजीनामा आहे, असे स्पष्ट मत दयानंद नाईक यांनी व्यक्त केलेय.
त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा जेणेकरून पतपेढीची पद व प्रतिष्ठा जपली जाईल, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. पतपेढीकडे संबंधित शिक्षकाचे येणे नाही पण पतपेढी त्यांना देणे लागते , असा हिशेब पत्र देतात म्हणजेच ना हरकत दाखला देण्यास काय हरकत नाही. तरी आंतरजिल्हा बदलीधारकांनी पर जिल्ह्यात गेले तर ठीक नाहीतर मागच्या प्रमाणे त्यांची बदली झाली नाही तर पुन्हा त्यांना नव्याने सभासद व्हावे लागणार. अशा प्रकारे कुचंबना करून व ना हरकत दाखला देणार नाही असे सांगून घेतलेले राजीनामे परत द्यावेत असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.