भजन कला टिकवणे आपले कर्तव्य : विशाल परब

Edited by: भरत केसरकर
Published on: August 13, 2023 19:24 PM
views 229  views

कुडाळ : भजन हि कोकणाची गुरु - शिष्य परंपरा लाभलेली एक आगळीवेगळी कला आहे. ही कला कालानुरूप टिकवणे आणी ती वृद्धिंगत करणे हे एक कोकणवासी म्हणुन आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन विशाल परब यांनी केले.

संगीतरत्न भजनसम्राट बुवा भालचंद्र केळुस्कर संचलित नमो शरद संगीत क्लासेस व श्री. लिंग रवळनाथ मेडेश्वर मित्रमंडळ आयोजित गुरुपौर्णिमा संगीत महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे भाजप युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते झाले या उद्घाटन प्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत आणी विशाल परब यांनी एकत्र येत हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले निलेश राणे यांच्या माध्ममातून भविष्यात या कुडाळ आणी मालवण तालुक्यात अनेक विकास कामाचा धडाका पहायला मिळणार आहे.संगीत क्षेत्रात गुरू शिष्याचे नाते महत्त्वपूर्ण आहे.तसच राजकारणातील आमचे गुरू निलेश राणे आहेत.त्यांचा शब्द आम्ही कधीही खाली पहायला देणार नाही आहोत.असे सांगत या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर दादा साईल, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, अनंत सामंत, दिपक नारकर, पप्या तवटे, रुपेश कानडे, रांगणा तुळसुली उपसरपंच नागेश आईर,हिर्लोक हायस्कुल चेअरमन उदय सामंत, शक्तिकेंद्र प्रमुख सुर्यकांत नाईक, सुनील बांदेकर,संगीतरत्न भजनसम्राट बुवा भालचंद्र केळुस्कर,बुवा रामचंद्र सावंत आदी उपस्थित होते.