ठेकेदार हा सरकारचा जावई आहे काय..? | सतीश सावंत का संतापले

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 25, 2023 20:14 PM
views 333  views

कणकवली : शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने  कनेडी ते नरडवे पर्यंतचा रस्ता ज्या ठेकेदारांने हा रस्ता केला, त्या रस्त्यावर पूर्णपणे खड्डे पडलेले असून,अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केला असल्याने कार्यकारी अभियंता ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तुम तो सरकारचा जावई आहे काय असा सवाल  माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी  आज  कनेडी बाजारपेठ येथे रास्ता रोको आंदोलन दरम्यान केला  .

कनेडी ते नरडवे पर्यंतचा रस्ता ज्या ठेकेदारांने हा रस्ता केला, त्या रस्त्यावर पूर्णपणे खड्डे पडलेले असून,अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केनेडी आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी भेटी दरम्यान आलेल्या उपकार्यकारी अभियंता के.के. प्रभू यांनी  कनेडी ते दुबळेश्वर राज्यमार्गावर  पडलेले खड्डे, आणि वरती आलेली खड्डी 31  ऑगस्ट पर्यंत बुजविले तातडीने भुजविले जातील. आणि जे काम निकृष्ट दर्जाचे झालेले ते काम 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत नव्याने करण्याचं आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिलं असल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, उत्तम लोके, आदि शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा ठेकेदार सरकारचा जवाई असल्या सारखा वागत असल्याने,सत्तेच्या जोरावर पाठीशी घालण्याचा काम कार्यकारी अभियंता करत असेल, तर गणेश चतुर्थीच्यापूर्वी जसास तसं उत्तर दिलं जाईल कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी रास्ता रोको दरम्यान दिला आहे.