...म्हणून जिल्ह्याला मिळत नाही चांगली आरोग्यसेवा

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची टीका
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 18, 2023 11:05 AM
views 115  views

कुडाळ : सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांना योग्य रुग्णसेवा मिळत नसून मागील सात ते आठ महिन्यांपासून येथे आयसीयू बंद आहे. तर येथे असलेले मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय यांच्यातील अधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्यामुळे सिंधुदुर्गतील जनतेला योग्य आरोग्य सुविधा मिळत नसल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली. कुडाळ येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.