श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आंतरराज्यीय ऑनलाइन भव्य स्पर्धा

Edited by: विनायक गावस
Published on: July 10, 2023 19:57 PM
views 129  views

सावंतवाडी : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक दिन. हिंदवी स्वराज्यात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण याच दिवशी इतिहासात शिवरायांना न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला आणि रयतेचा राजा छत्रपती झाला.ही घटना इतिहासात सुवर्णक्षरात कोरली गेली.या दैदिप्यमान सोहळ्याला ३५० वर्षे झाली. म्हणूनच चालू वर्ष हे शासनातर्फे शिवराज्याभिषेक शक म्हणून जाहीर करण्यात आलेल आहे. शिवशाहीचा जागर करण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम  शासनातर्फे आयोजित करण्यात  आलेले आहेत. अखंड शिवविचारांचे व्रत घेतलेल्या  शिवसंस्कारने स्पर्धांचे आयोजन  या निमित्ताने केले आहे.  शिवराज्या भिषेकानिमित्त सर्व स्पर्धा ऑनलाइन स्वरूपाच्या महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक,गुजराथ या चार राज्यात  आयोजित करण्यात येत आहेत.

रांगोळी स्पर्धा-खुला गट विषय-१.शिवराज्याभिषेक सोहळा २.छत्रपती शिवाजी महाराज, रांगोळी सुरू करताना व पूर्ण होतानाचा पंधरा सेकंदाचा व्हिडिओ पाठवणे अनिवार्य आहे.

निबंध स्पर्धा :लहान गट- ७ वी ते १० वी, खुला गट- १५ वर्षांपासून पुढे,शब्दमर्यादा १५०० ते २०००

आपला निबंध नेताजी शिशुविहार ,२७७,डी, सबनीसवाडा,सावंतवाडी,सिंधुदुर्ग४१६५१० या पत्यावर पाठवावा. निबंधावर नाव घालू नये. नावाचा वेगळा कागद जोडावा. विषय- शिवराज्याभिषेक सोहळा


समूह गीत गायन स्पर्धा- वेडात मराठे वीर दौडले सात या एकाच गीतासाठी ही स्पर्धा असून संपूर्ण गीत सादर करणे बंधनकारक आहे.गट- ४ थी ते ८वी, ८ पुढील सर्व वयाचा खुला गट रांगोळी व समूहगीत स्पर्धा ऑनलाइन असून दिलेल्या संम्पर्क क्रमांकावर आपले व्हिडिओ ,गीत दि. १५ जुलै २०२३ पर्यंत पाठवावे.जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवसंस्कार चे कार्याध्यक्ष श्री गणेश ठाकूर व अध्यक्षा डॉ सोनल लेले,सदस्य श्री भरत गावडे व प्रा सुभाष गोवेकर यांनी केले आहे

रांगोळी व निबंध स्पर्धा फी रु.५०/- तर समूह गीत स्पर्धा फी रु १००/- असून संस्थेच्या क्यू आर कोड वर पाठवायची आहे.  अधिक माहितीसाठी

संपर्क- 9607827296