
सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी योगशिक्षक शेखर बांदेकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाळेसोबतच पॉलिटेक्निक व फार्मसीचे विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शेखर बांदेकर यांनी यावेळी योगाची विविध प्रात्यक्षिके करुन दाखवली. योगा कसा करावा, त्याचे आपल्या जीवनात असणारे महत्त्वपूर्ण स्थान याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजना वैद्य व नेहा महाडेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन संपदा राऊळ यांनी केले.