सरस्वती विद्यामंदिर कुडासे प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Edited by: संदीप देसाई
Published on: June 21, 2023 18:10 PM
views 76  views

दोडामार्ग : सरस्वती विद्यामंदिर,कुडासे प्रशालेमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विविध योग आसने करून साजरा करण्यात आला. ध्यान हे मन, शरीर, विचार आणि कृती नियंत्रित करण्यास मदत करते विविध आसनांमुळे शरीर लवचिक बनते, संतुलन राखण्यास आणि शक्ती प्रदान करण्यास मदत होते. ध्यान एकाग्रता शक्ती सुधारते, मुलांमध्ये ते स्मरणशक्ती विकसित करण्यास मदत करते योगाचे अनेक फायदे आहेत. योगामुळे काही आजारांवरही नियंत्रण ठेवता येते योगा हे दीर्घायुष्याचे मुख्य रहस्य आहे असे मत सहज योगा संस्थेच्या पूर्वा नाईक यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रशालेचे क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी सर यांनी योगाचे महत्व सहज व सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून दिले. सहज योगा संस्थेचे पूर्वा नाईक ,वर्षा ठाकूर, प्रकाश नाईक, हरी कर्पे यांनी यावेळी उपस्थित होते इयत्ता पाचवी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी  विविध आसने केली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस.एस.परब मॅडम यांनी सहज योगा संस्थेतील मान्यवराचे स्वागत केले. तर आभार ज्येष्ठ  शिक्षक एस.व्ही.देसाई सर यांने केले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.