
सावंतवाडी : जागतिक महिला दिनानिमित्त घे भरारी फाउंडेशनतर्फे युवती व महिलांसाठी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी जगन्नाथराव भोसले शिवउद्यान इथं घेण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता पाककला स्पर्धा होईल. यामध्ये घटक आहे चनाडाळ, चना डाळी पासून गोड व तिखट पदार्थ बनवणे वेळ आहे सकाळी 11 ते 12 या दरम्यान घेऊन येणे, यामध्ये दोन्हींमध्ये प्रथम द्वितीय तृतीय व दोन उत्तर्जनात बक्षीस देण्यात येणार आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. स्पेशल भाऊजी समीर चराटकर कुडाळ येथून येणार आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक पैठणी, दुसरे पारितोषिक कांजीवरम साडी, तृतीय पारितोषिक इरकल साडी देण्यात येणार आहे.
मधल्या वेळेत वक्तृत्व स्पर्धा महिलांसाठी व युवतींसाठी घेण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरण याबद्दल दोन मिनिटे बोलणे ही स्पर्धा असेल. त्यात दोन बक्षीस देण्यात येतील अशी माहिती घे भरारी फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. मोहिनी माडगावकर यांनी दिली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील व इतर महिलांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून भाग घ्यावा असे आवाहन देखील उपाध्यक्ष रिया रेडीज सेक्रेटरी सरिता फडणीस खजिनदार अदिती नाईक, रेखा कुमठेकर संचालिका शारदा गुरव, ज्योती दूध वाडकर, सलोनी वंजारी, दर्शना बाबर देसाई, धनश्री इंदुलकर, वंदना मडगावकर, सीमा रेडीज, मेघना साळगावकर, सुष्मिता नाई, स्वप्नाली कारेकर, साक्षी परुळेकर, गीता सावंत, मेघा भोगटे, प्रतीक्षा गावकर, अर्चना खानोलकर यांनी आवाहन केले आहे.