पदर प्रतिष्ठान च्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

यावेळी पाककला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ देखील करण्यात आला.
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 10, 2023 10:16 AM
views 158  views

कणकवली : पदर महिला प्रतिष्ठान तर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्षा हर्षदा गव्हाणकर, प्रज्ञा ढवण, रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, सुप्रिया नलावडे, प्रियाली कोदे, हर्षदा वाळके, विनिता बुचडे, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे, कविता राणे, मेघा सावंत, सुप्रिया नलावडे,प्रतिक्षा सावंत माजी नगराध्यक्ष सायली मालंडकर इत्यादी उपस्थित होत्या. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत नेत्या स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने तालुक्यातील नामांकित आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना पुरस्कृत करण्यात आले. या पुरस्काराचे मानकरी प्रथितयश डॉक्टर अश्विनी समिर नवरे, डॉक्टर प्रिती सुहास पावसकर, कवियत्री आणि बॅंक कर्मचारी उज्वला धानजी, कोरोना काळात झोकून देऊन काम करणाऱ्या परिचारिका नैना अभिजित मुसळे, महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या स्नेहलता जगदिश राणे ठरल्या.तसेच काबाडकष्ट करून नवऱ्याच्या पश्चात किंवा नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा भार उचलत मुलांना शिक्षण देणाऱ्या कष्टकरी महिलांचे सन्मान करण्यात आले. यामध्ये ‌स्नेहा सातवसे, रश्मी रामदास परब,उमा संतोष घाडी, विजयाबाई सरूडकर/ शेट्ये, साक्षी रामचंद्र शिंदे समावेश होता. यावेळी पाककला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ करण्यात आला. पाककला निकाल पुढीलप्रमाणे :

१) प्रथम क्रमांक

स्पर्धक क्रमांक ०६ सेलिब्रेशन ऑफ मिलेट

चेतना भानुशाली मांगे

२) द्वितीय क्रमांक

स्पर्धक क्रमांक ३२ भरड धान्याची थाळी

मिताली माणगांवकर

३) तृतीय क्रमांक

स्पर्धक क्रमांक २७ नाचणी चिकू हलवा

शिवप्रिया हिर्लेकर

४) उत्तेजनार्थ १

स्पर्धक क्रमांक २९ राजगिरा बर्फी

शर्वरी ओंकार जाधव

५) उत्तेजनार्थ २

स्पर्धक क्रमांक २४नाचणीचे मोमोज

मंजिरी वारे

यामध्ये एकूण ३५ स्पर्धक सहभागी झाले होते. त्या सर्व सहभागीना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

या परीक्षेचे परीक्षण शेफ अमित टकले आणि प्रवीण तायशेटे यांनी केले

बेस्ट आऊट ऑफ वेस्ट

प्रथम क्रमांक १) प्रियाली सुरेंद्र कोदे

द्वितीय क्रमांक २) आस्मा आसिफ बागवान

या स्पर्धेचे परीक्षण अर्पिता मुंबरकर यांनी केले

तृतीय क्रमांक ३) उज्ज्वला धानजी

सर्व सहभागी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.

रस्सीखेच प्रथम विजेता – यंगस्ट्रार महिला गृप

उपविजेता – साज महिला गृप

यावेळी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. कमीत कमी पाच वाक्यांचा उखाणे असलेल्या प्रत्येक स्पर्धकाला बक्षिस देण्यात आले.

त्यानंतर नगराध्यक्ष समिरजी नलावडे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत महिलांनी केवळ सांस्कृतिक कार्यक्रम करण्यावर भर न देता उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती करावी त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि इतर सर्व मदत आपण स्वतः करण्यास तयार आहोत असे आश्वासित केलेले आहे.

महिलांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, पदर महिला प्रतिष्ठानच्या सर् सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यामध्ये १६०० ते १८०० मधल्या काळात ज्या राजघराण्यातील स्त्रिया होऊन गेल्या त्यांची आठवण, ती संस्कृती जपण्यासाठी फॅशन शोच्या रूपाने प्रियाली कोदे यांनी महिलांना संधी दिली. यामध्ये पुजा माणगांवकर -. ताराराणी ,दिशा अंधारी – मीरा, प्रिया वाळके – अनारकली ,स्नेहा कामत- जोधाबाई, साक्षी वाळके – राणी पद्मावती, संजना सदडेकर – मस्तानी, गार्गी कामत- काशीबाई, प्रतिक्षा सावंत- सईबाई,रमा वाळके- राणी लक्ष्मीबाई, उमा परब- हिरकणी संपदा पारकर- येसूबाई , सुषमा पोटफोडे – जिजामाता आणि राजश्री रावराणे- राणी एलिझाबेथ

सौंदर्य स्पर्धेची सर्व तयारी प्रियाली कोदे यांनी करून घेतली होती

याशिवाय कराओके सॉंग कविता वाचन एकपात्री आणि रेकॉर्डनं डान्स महिलांनी सादर केले यामध्ये कृपा सादये माया आरती वायंगणकर आणि मधुरा मल्हार दर्शना राणे याज्ञवी कोदे आणि प्रियाली कोदे, प्रणाली चव्हाण मनवा शेट्ये, दर्शना राठोड मनीषा मयेकर लीना काळसेकर गार्गी कामत आणि वेदा , दिशा राणे, प्रतीक्षा सावंत आणि निधी , नयना मुसळे पूर्वा मुसळे नवाळे मॅडम संपदा पारकर, श्रेया परब कशिश, सोनल साळगावकर, दीपा सरूडकर, माणगावकर मॅडम आणि विद्यामंदिर हायस्कूल ग्रुप, प्रेरणा आणि भक्ती, सांची घाडी, तृप्ती कांबळे, अंजली राणे, विजया शेट्ये

अशा विविध महिलावर्गांने सहभाग घेतला. आई आणि त्यांच्या मुलींचा पर्फामन्स हे या कार्यक्रमामध्ये वैशिष्ट्य होते. सहभागी आई आणि मुलीला विशेष बक्षिसे दिली.

यावेळी पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा अजय गांगण उपाध्यक्ष हर्षदा गव्हाणकर सुप्रिया नलावडे संजीवनी पवार संगीता बेलवलकर अंकिता करपे भारती पाटील विनिता राणे राजश्री परब, स्मिता पावसकर, सोनाली परब स्मिता कामत मनीषा गोवेकर स्नेहलता राणे, रंजना कुडरतरकर, वैजयंती मुसळे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया समीर नलावडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन मेघा अजय गांगण यांनी केले.