
कुडाळ : आपल्या घराशेजारील परिसरात आणि जंगलामध्ये पावसाळ्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या निसर्ग उपयोगी रानभाज्या उपलब्ध करून विद्यार्थी वर्गाने जे रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. तो उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांसाठी "कमवा आणि शिका" या धर्तीवर कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मनोदय आहे. ज्यातून विद्यार्थी अशा रानभाज्या आणि निसर्गातील मिळणारे इतर घटक वस्तू विकून स्वतःची उपजीवका करून शिक्षण घेऊ शकतील. असे प्रतिपादन माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सगुण धुरी यांनी केले.
माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचिल श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव हायस्कूल येथील रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या रानभाजी प्रदर्शन व गावठी बाजाराचे उद्घाटन संस्थाध्यक्ष सगुण धुरी यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी संस्थेचे सीईओ, वि.न.आकेरकर, सचिव एकनाथ केसरकर, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर,पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण,मार्गदर्शक शिक्षक गिरीष गोसावी,सौ.सीमा पाटील,प्रमोद धुरी,राजेंद्र कदम,चंद्रकांत पटकारे यासह शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
विविध रानभाज्यांचे प्रदर्शन यावेळी लावण्यात आले होते.विज्ञान शिक्षक गिरीष गोसावी व चंद्रकांत पटकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.