प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतील वारसास जिल्हा बॅंकेतर्फे दोन लाखांचा विमा सुपूर्द!

Edited by: प्रतिनिधी
Published on: December 24, 2022 21:13 PM
views 391  views

आरोंदा : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्यावतीने राबवली जाते. या योजनेंतर्गत कुत्रा चावल्याने मृत्यु झालेल्या आरोंदा येथील मिलिंद निळकंठ पावसकर यांच्या वारस पत्नी मनाली मिलिंद पावसकर यांना दोन लाख रक्कमेचे विमा पत्र देण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक आरोंदा शाखेच्या शाखा व्यवस्थापक स्मिता नारायण शेणवी-केरकर यांच्या हस्ते हे पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी अन्य बॅंक कर्मचारी उपस्थित होते.

  सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावातील मिलिंद निळकंठ पावसकर यांचे कुत्रा चावल्यामुळे निधन झाले होते. त्यांच्या नावे सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी मनाली यांना जिल्हा बॅंक आरोंदा शाखेच्या माध्यमातून दोन लाख रुपये रक्कमेचे विमा पत्र सुपूर्द करण्यात आले.