
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मंडळ - क्षेत्रफळ मधील सजा इन्सुली, क्षेत्रफळ, कुंभार्ली, वेत्ये, निगुडे, रोणापाल, शेर्ले, कास या गावातील सर्व ग्रामस्थांना करिता 25/04/2025 रोजी सकाळी 11.30 ते 3 या वेळेत इन्सुली ग्रामपंचायत सांस्कृतिक हॉल शाळा नं. 1 येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनखाली अभियान आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना उत्पन्न व जातीचे दाखले, सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ, फार्मर आयडी कार्ड काढणे तसेच महसूल संदर्भातील इतर कामे व दाखले देण्याबाबतचे कागदपत्र तयार करून घेण्यात येणार आहे. तरी ज्या ग्रामस्थ लाभार्थ्यांनी वरील वेळेत उपस्थित राहून लाभ घ्यावा असे मंडळ अधिकारी मालवणकर,इन्सुली तलाठी भक्ती सावंत यांच्याकडून करण्यात आले आहे.