
दोडामार्ग : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी एम. आर. नाईक विद्यालय, कोनाककट्टा या प्रशालेत संस्था, पालक-शिक्षक मेळावा संपन्न झाला.
या प्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष सुरेश यशवंत दळवी, संस्था सचिव सौ. एस. एस. नाईक, संस्थेचे संचालक सुधाकर बांदेकर, विलास नाईक, कोनाळकट्टा सरपंच सौ. अमिता गवस, उपसरपंच रत्नकांत कर्पे, ग्रामपंचायत सदस्या सौ. शुभ्रा लोंढे, पोलीस पाटील सेजल बांदेकर, सौ. गौतमी शेटवे, सौ. शिरवलकर, माता-पालक उपाध्यक्षा कल्पिता सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीते सादर केली. स्पर्धेच्या युगात टिकून राहायाचे असेल तर कष्ट, केले पाहिजेत, जिद्दीने, धीराने, चिकाटीने प्रयत्न केले तर यश आपणापासून दूर पळू शकत नाही, मात्र त्यासाठी शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन मार्गदर्शक के. एस. नाईक यांनी केले. अ. सी. गवस यांनी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीत पालकांची भूमिका विषद केली तर वाय. ए. सावंत यांनी 'विद्यार्थी संख्या, पालक व समाजाचे शैक्षणिक विकासातील योगदान' यावर विचार व्यक्त केले.
संस्थाध्यक्ष सुरेश दळवी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शाळेच्या उत्कर्षासाठी शिक्षकासह पालकांनीही कटिबद्ध व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आडेलकर मॅडम, ओतारी सर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच मुख्याध्यापक श्री. घोगळे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. आडेलकर मॅडम यांनी केले. या प्रसंगी सुरेल श्री सावंत व्ही. व्ही. सावंत व कृष्णा लोंढे यांच्या सुरेल संगीत साथीसह सादर केलेल्या समूहगीत प्रार्थनेला रु ५,०००/- चे रोख पारितोषिक संस्थाध्यक्ष सुरेश दळवी यांनी दिले.