
कुडाळ : कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या वडगणेश ते नेरुर जकात माणकादेवी रस्ता आणि कुडाळ-मालवण मुख्य रस्ता या दोन्ही महत्त्वाच्या रस्ते कामांची नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या दौऱ्यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कामाच्या दर्जाबाबत आणि नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून आवश्यक मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.
आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघातील दळणवळण सुलभ व्हावे यासाठी या रस्त्यांचा पाठपुरावा केला होता. या कामांची प्रगती आणि तांत्रिक बाबी तपासण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश पवार यांनी रस्त्याची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी किंवा विहित मुदतीत ही कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधित विभागाला देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने: संदेश नाईक (शिवसेना विभागप्रमुख, नेरुर), सौ. भक्ती घाडी (सरपंच, नेरुर), दत्ताराम म्हाडदळकर (उपसरपंच), शाम गावडे (माजी उपसरपंच)राजेश सडवेलकर (माजी ग्रामपंचायत सदस्य), तुषार गावडे (शाखाप्रमुख), जयराम परब (बुथ अध्यक्ष), अक्षय शिंदे (युवा सेना उपविभाग प्रमुख), हर्ष ठाकूर, अजित मार्गी, महेश गावडे, निलेश रावले व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. संदेश नाईक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना रस्त्याचे काम योग्यरीत्या करण्याची सूचना केली.










