उद्योग मंत्री उदय सामंत यांचा असा आहे जिल्हा दौरा...!

Edited by:
Published on: November 24, 2023 19:11 PM
views 54  views

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.15 वा. चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचेसमवेत भारतीय नौसेना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, जि. सिंधुदुर्ग). दुपारी 12.15 वा. पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचे समवेत मोटारीने ओरोस जि. सिंधुदुर्ग येथून मालवणकडे प्रयाण. दुपारी 12.40 वा. टोपीवाला हायस्कूल येथील हेलिपॅड व सेफ हाऊसची पाहणी. दुपारी 1.00 वा. मा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे समवेत राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी व सुशोभिकरण कामाची पाहणी. दुपारी 1.15 वा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे समवेत तारकर्ली येथील विविध कामांची तसेच एम.टी.डी.सी. विश्रामगृहाची पाहणी. दुपारी 2.00 वा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे समवेत कुंभारमाठ येथील हेलिपॅड व सेफ हाऊसची पाहणी. दुपारी 2.15 वा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे समवेत मोटारीने चिपी, सिंधुदुर्ग विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचेसमवेत चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन व चिपी विमानतळ पाहणी व आढावा. दुपारी 3.15 वा. चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ येथून विमानाने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.