
कुडाळ | भरत केसरकर : :उपदेशाचे डोस आणि फटकेबाजी बसलेल्या प्रेक्षकातील काहींना चिमटे काढत, तितक्याच ताकदीने हसवत आणि टोले लगावत इंदुरीकर महाराजांनी आपल्या अनोख्या स्टाईलने कीर्तनासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना खळखळून हसविले. यावेळी युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक महाराजांचा सन्मान केला. यावेळी विशाल यांच्यासारखे नवउद्योजक आणि पर्यायाने दाते तयार झाले पाहिजेत. तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन इंदुरीकर महाराज यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले.
भाजप युवानेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सभागृह हाऊसफुल्ल होवून प्रेक्षकांसाठी बाहेर स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी उपस्थित रसिकांनी इंदुरीकर महाराजांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना तितक्याच प्रभावीपणे दाद दिली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांना त्यांनी उपदेश देण्याबरोबर खळखळून हसविले. यात मुलांनी मोबाई पासून दूर राहिले पाहिजे. पालकांचे ऐकले पाहिजे, असे उपदेश त्यांनी दिले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांची त्यांनी आपल्या पध्दतीने फिरकी घेतली. तसेच मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी मोबाईल वापरणार नाही असा कठोर निर्णय पालकांनी आणि शिक्षण संस्थांनी घ्यावा, जेणेकरुन तरुण पिढी बर्बाद होणार आहे, असा उपदेशही त्यांनी केला.
विशाल परब आणी सौ.वेदिका परब कुटुंबीयांना माझा नेहमीच आशीर्वाद
यावेळी इंदुरीकर महाराज यांनी विशाल परब यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद दिले. त्यांच्यासारखा युवा उद्योजक यशस्वी झाला तर नक्कीच तो दाता होतो. परब कुटुंबीयांची पुढील पिढी सुद्धा उत्तरोत्तर प्रगती करेल, असा आशीर्वाद दिला.न भूतो न भविष्यती अशी गर्दी कुडाळमध्ये इंदुरीकर महाराज यांची कीर्तन ऐकण्यासाठी गोवा, कोल्हापूरसह सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आले होते. या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी झाली तरी युवानेते विशाल परब यांनी नागरिकांसाठी स्क्रीन लावून इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.असंख्य भाविकांनी ह्या कीर्तनाचा आनंद घेतला.यावेळेस चोख नियोजन आणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या नियोजन आणी आयोजनाचेही माजी खासदार निलेश राणेंनी तोंडभरून कौतुक केले.










