
देवगड : देवगड माजी जिल्हा परिषद सदस्या कै. इंदिरा जगन्नाथ दुखंडे यांचे गुरुवारी १५ फेब्रुवारी २०२४ ला अल्पशा आजाराने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
देवगड तळवडेचे माजी सरपंच पंकज जगन्नाथ दूखंडे यांच्या त्या मातोश्री होत्या. कणखर नेतृत्व म्हणून देवगड तालुक्यामध्ये त्यांची खूप मोठी ओळख होती. गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्या व त्यांचे कुटुंबिय गेली कित्येक वर्षे योगदान देत आहेत. वृद्धाप काळामुळे गेली काही वर्षे त्या या सक्रिय राजकारणा पासून लांब होत्या.परंतु त्यांचे हे जनसेवेचे काम त्यांचे चिरंजीव पंकज जगन्नाथ दुखंडे यांनी गेली कित्येक वर्षे पुढे चालू ठेवले आहे. जनसेवेचे हे काम ते अविरतपणे करत आहेत. कै. इंदिरा जगन्नाथ दुखंडे त्यांच्या माध्यमातून तालुक्यात गावामध्ये अनेक विकास कामे त्या वेळी झाली. त्यांचे संपूर्ण कार्य हे जनसामान्यांसाठी होते.
कै.इंदिरा जगन्नाथ दुखंडे देवगडच्या राजकारणातील जुन्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यांचे घराणे गेली कित्तेक वर्षे समाजसेवेचे काम अविरतपणे करत आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, ३ मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे देवगड तसेच तळवडे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.