
सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलला 'इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड' हा 'शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक अँड. रूजूल पाटणकर यांना पुरस्कार देत गौरविण्यात आले आहे. यासाठी त्यांनी सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक, मार्गदर्शक आणि हितचिंतक यांचे आभार मानले आहेत. आमच्यावर सतत पाठिंबा आणि विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आमचा हा प्रवास असाच चालू ठेवू आणि परिपूर्णतेसाठी सतत कठोर परिश्रम करू, असं मत त्यांनी व्यक्त केल.