
सावंतवाडी : भारत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये केंद्र शाळा बांदा नंबर एकचा इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर हा संपूर्ण जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरावर टॉप टेनमध्ये सिलेक्ट झाला.
तसेच खेमराज मेमोरियल स्कूल बांदाचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी वेदांत संदीप सावंत याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तो राज्यात गुणवत्ता यादीमध्ये तेराव्या स्थानी झळकला. यासाठी वेदांत आणि नील यांना शुभेच्छा सावंत यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
विविध स्तरातून नील आणि वेदांतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.