
सावंतवाडी : सावंतवाडी उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या कार्यालयात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते.
तसेच स्वातंत्र्य सैनिक वसंत उर्फ अण्णा केसरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, बाबू कुडतरकर, राजू बेग, सुरेंद्र बांदेकर, सुरेश भोगटे, शुभांगी सुकी, शर्वरी धारगळकर, दिपाली भालेकर, भारती मोरे, पुंडलिक दळवी, दिलीप भालेकर, बावतीस फर्नांडिस तसेच नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.