सावंतवाडी : मळगाव- वेत्ये गावात कोणत्याही प्रकारचे मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे ही समस्या तात्काळ दूर करण्यात यावी, या मागणीसाठी येथील वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे केली आहे.
दरम्यान उद्धवलेली समस्या दूर करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू असे आश्वासने संबंधित अधिकाऱ्यानी सरपंचांना दिले.त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, गावात तरुण-तरुणी वर फ्रॉम होम काम करत आहेत त्यांना नेटवर्क नसल्यामुळे त्यांची कामे कोळंबली आहेत तसेच कॉल करण्यासाठी सुद्धा गावात नेटवर्क नसल्यामुळे तेथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आपण या समस्यांची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी निवेदनदारी केली आहे. यावेळी सुनील गावडे उपस्थित होते.