
मंडणगड : दि. बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा मंडणगड व ग्राम शाखा आतले व आतलेसडा यांच्या संयुक्त विद्यमाने 13 जुलै 2025 रोजी सारनाथ बुध्द विहार आतले येथे वर्षावास धम्म प्रवचन उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून हर्षद जाधव, प्रमुख मार्गदर्शक व प्रवचनकार म्हणून एन.बी.कदम, यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून आल्पेश सकपाळ, देवेद्र मोरे, सुदर्शन सकपाळ, प्रमोद सकपाळ, शरद धोत्रे, दिनेश साखरे, जीवन मोहीते, सुरेश तांबे, सुभाष खैरे, रोहीत तांबे, शिल्पा खैरे, विकास खैरे, शैलेश पवार, रामचंद्र खैरे, जीतेंद्र जाधव, तुषार करावडे, सपना करावडे, बाळाराम तांबे, आशितोष बिजूर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल सकपाळ, वैभव खैरे, प्रफुल खैरे यांनी केले.