वागदे येथे विविध कामांच्या शुभारंभाचा धडाका

जल जीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 28 लाखाच्या कामाचे उदघाटन करत घेतली विकासाची गरुड झेप
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 27, 2022 18:29 PM
views 312  views

कणकवली : वागदे येथे ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत  3 विहिरी 2 पाण्याच्या टाक्या 2 पंप हाऊस व पाईपलाईन असे एक कोटी 28 लाखाच्या कामाचे उद्घाटन आज माझी उपसरपंच तथा वागदे गावचे मानकरी श्रीधर घाडीगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच पंधरा वित्त आयोगाअंतर्गत इतर विविध कामांची देखील उद्घाटन आज करण्यात आली.

वागदे ग्रामपंचायत आचारसंहिता संपल्यानंतर विकास कामांचा धडाका लावला आहे.वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी गेली पाच वर्ष सातत्याने ग्रामपंचायतीसाठी आणलेला विकास निधी व केलेले प्रस्ताव तसेच ग्रामपंचायत सदस्य ललित घाडीगावकर व इतर सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे . त्यामुळेच आज वागदे येथे झालेल्या विविध विकास कामांची उद्घाटन आज  पार पडली तसेच इतरही विकास कामांचे उद्घाटन उद्याच्या दिवसात पार पडणार आहेत. 

आज झालेल्या उद्घाटन प्रसंगी वागदे सरपंच रुपेश आबडोसकर, सदस्य ललित घाडीगांवकर,माझी उपसरपंच श्रीधर घाडीगांवकर,रवींद्र गावडे, सुषमा गोसावी, दीपक गोसावी,मनोहर घाडीगांवकर, सुरेंद्र कदम,विलास कदम,चंद्रकांत गोसावी,शिरीष घाडीगावकर, संभाजी घाडीगांवकर, अनंत घाडीगांवकर, शंकर घाडीगांवकर, नयन गावडे, शरद सरंगले, सुधाकर गोसावी, अमित घाडीगांवकर, सहदेव कदम, सत्यवान कदम,मधूकर कदम,सुभाष कदम, रंजन कदम, विनायक गावडे, निलेश गावडे, सोमा घाडीगांवकर, भालचंद्र घाडीगांवकर, शैलेश घाडीगांवकर व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे गावच्या विकासाला  चालना मिळणार आहे