वैभववाडी पंचायत समितीचे उद्घाटन अखेर रद्द | पुन्हा चुकला मूहुर्त

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 07, 2024 14:39 PM
views 251  views

वैभवाडी : पंचायत समिती इमारतीच्या नुतन वास्तूच्या उद्घाटनाचा पुन्हा मुहूर्त चुकला आहे.उद्या दिनांक ८मार्च रोजी होणार उद्घाटन अचानक रद्द झालं आहे.आतापर्यंतची ही तिसरी वेळ आहे.

गेली दहा वर्षे काम सुरू असलेल्या पंचायत समिती इमारतीच्या नुतन वास्तूच्या उद्घाटनाला मुहूर्त काही मिळेना.उद्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन अचानक रद्द झालं आहे.यापुर्वीही जानेवारी महिन्यात उद्घाटनाची दोन वेळा तयारी करण्यात आली होती.त्याही वेळी अचानक रद्द करण्यात आली होती.उद्याच्या उद्घाटनाच नियोजन झाले होते.पालकमंत्री यांचा दौराही जाहीर झाला होता.मात्र सायंकाळी हा कार्यक्रम रद्द झाल्याबाबत कळविण्यात आले.