व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे वेंगुर्ल्यात उद्घाटन

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा यावर्षी होतोय वेंगुर्ला इथं !
Edited by: दिपेश परब
Published on: January 18, 2023 18:29 PM
views 279  views

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा यावर्षी वेंगुर्ला येथे होत आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला येथे सुरू करण्यात आलेल्या व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हा मेळावा भव्य दिव्य होणार असून मेळाव्याची जय्यत तयारी वेंगुर्ले येथे सुरू असल्याचे सांगितले.

वेंगुर्ला गाडीअड्डा नाक्यावरील नगरपरिषदेच्या व्यापारी गाळ्यांमध्ये हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महासंघाचे कार्यकारी सदस्य अनिल सौदागर, निलेश धडाम, राजेश शिरसाट, नंदन वेंगुर्लेकर, वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर यांच्यासह व्यापारी राजीव पांगम, कपिल पोकळे, राजन गावडे, श्रीनिवास सौदागर, नितिन सावंत, न्बाळा शिरसाट, संजय तानावडे, नानू किडये, गणेश नार्वेकर, सुरेखा वाळके, गीता अंधारी,  मिलिंद शिवलकर, प्रथमेश परब, राजेश सापळे, संदेश सडवेलकर, हरेश खानोलकर आदी उपस्थित होते.